माधव उद्योग समूह हे एक सामाजिक संस्था (NGO) आहे, जी समाजसेवा व रोजगार निर्मितीसाठी कार्यरत आहे. आमचा मुख्य उद्देश लोकांना रोजगार आणि उत्पन्नाचे संधी उपलब्ध करून देणे आहे. तसेच, आम्ही गृह उद्योग, आरोग्य सेवा, व शैक्षणिक सेवांमध्येही कार्यरत आहोत.
समाजातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक सक्षम बनवून त्यांना आत्मनिर्भर करणे.
सामाजिक प्रकल्प, रोजगार संधी, शिक्षण आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून लोकांचे जीवनमान उंचावणे.
आम्ही वेगवेगळ्या प्रकल्पांतर्गत लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो. घरबसल्या काम करून उत्पन्न मिळवण्याची संधीही उपलब्ध आहे.
गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना व स्वयंरोजगार इच्छुकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते.
आरोग्य सेवा आणि वैद्यकीय मदतीसाठी आम्ही रुग्णालये व हेल्थ कॅम्प्स आयोजित करतो, जेणेकरून गरजू लोकांना मदत मिळू शकेल.
आम्ही शिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबवतो, जेणेकरून युवकांना उत्तम भविष्य घडवण्यासाठी मदत होईल.